द्राक्ष उत्पादन घटण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नाशिक - मॉन्सूनचा मुक्काम दिवाळीपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती आहे. एप्रिल-मेमध्ये बागांना पाण्याची चणचण भासल्याने अगोदरच उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच सततच्या पावसाने घड जिरू लागल्यामुळे यंदा पाऊस चांगला झाला असला तरी उत्पादनात २५ टक्‍क्‍यांपर्यंत घट येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

वरुणराजा सातत्याने हजेरी लावत असल्याने छाटणीचा खोळंबा होऊ लागला आहे. ऑक्‍टोबर छाटणीला वेग आला असला तरी पावसामुळे छाटणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पुढील महिन्याचा दुसरा आठवडा लागेल, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. मण्यांमध्ये पाणी उतरलेल्या अवस्थेत पाऊस झाल्यास  नुकसान होऊ शकते.

टॅग्स