‘त्या’ संशयिताला फाशी द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक रोड - चारवर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या सुभाष झंवरला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटना व विविध पक्षांतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर आज मूक मोर्चा काढण्यात आला. संबंधित मागणीचे निवेदन उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आले. 

दुर्गा उद्यानापासून मोर्चास सुरवात झाली. महात्मा गांधी रोडने मुक्‍तिधाम चौक, रेजिमेंटल प्लाझा, बिटको चौक, नाशिक- पुणे महामार्ग, मेनगेटने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निषेध सभा झाली.

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत जोमीवाले, किसन हुडीवाले, सागर गवळी, शंकर औशीकर, हिरामण गवळी, बबनराव गवळी, जगन गवळी, कैलास हिरणवाळे, राजूनामा गवळी, भाऊ हुच्चे, अनिल कोठुळे, अनिल वायकू, शिवाजी लगडे, लक्ष्मण गोडळकर, नंदू गवळी, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, राजेंद्र ताजणे, नाजाबाई सोनवणे, शशिकला औशीकर, सुनीता गवळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, नाशिक रोड भागातील ओढा रोडवर सुभाष झंवर याचा माऊली फरसाणचा कारखाना असून, या कारखान्यात काम करणाऱ्या महिलेच्या चारवर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. या नराधमास जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.