..अन्‌ ‘तिच्या’ कुशीत विसावली गोड तान्हुली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

सरकारवाडा पोलिसांची पाड्यांवर दोन दिवसांची शोधमोहीम फत्ते

नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात स्त्री जातीच्या अभ्रकाला जन्म दिलेला; परंतु त्या नवजात अभ्रकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना, संबंधित महिला आपले बाळ गेले म्हणून कोणालाही न सांगता निघून गेली. याबाबत जेव्हा सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली तेव्हा पोलिसांनी तपासाच्या पलीकडे जाऊन आदिवासी पाड्यांवर त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या महिलेला नाशिकला आणून तिच्या कुशीत बाळ सोपविले. आपले बाळ सुखरूप असल्याचे पाहून ते आदिवासी कुटुंब आनंदाने भारावून गेले.

सईबाई कृष्णा मोहतकर (२६, रा. आसाबेरी सत्ता, ता. मोखाडा, जि. पालघर) ही आदिवासी महिला गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. पाच-सहा दिवसांपूर्वी ही महिला बाळंत झाली. स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. दरम्यान, नवजात अर्भकाच्या वैद्यकीय चाचण्या व अधिक उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या मातेचा आपले बाळ जिवंत नसल्याचा गैरसमज झाला आणि ती अचानक कोणालाही काही न सांगता जिल्हा रुग्णालय सोडून निघून गेली.

जिल्हा रुग्णालयातर्फे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी यासंदर्भात पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याशी चर्चा करून त्या महिलेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमून ते आदिवासी पाड्यांवर पाठविण्याची परवानगी घेतली. त्यानुसार एका महिला पोलिससह तीन कर्मचाऱ्यांच्या पथकाने आदिवासी महिलेच्या शोधासाठी मोखाडा तालुक्‍यातील आदिवासी पाड्यांवर शोधमोहीम राबविली. त्यात त्यांना यश आले आणि सईबाई मोहतकर हिच्यासह तिचा पती व भाऊ यांना घेऊन हे पथक आज जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मोहतकर कुटुंबीयांच्या हाती त्यांचे बाळ सोपविण्यात आल्यानंतर ते आनंदाने भारावून गेले. बाळ सुखरूप व सुदृढ असल्याने त्यांनी साऱ्यांचे आभार मानले. मॅग्नम हॉस्पिटलचे डॉ. कुशमन वैद्य व मृणाल सांगळे यांनी बाळंतीणीला खारीक-खोबऱ्याचा पौष्टिक आहार सुपूर्द करून त्यांना पोलिस मित्र केदार निकम यांनी घरपोच वाहनाची व्यवस्था करून दिली. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. कोल्हे यांच्यासह पोलिसांचे कौतुक करून आभारही मानले.

Web Title: An 'her' side slowly sweet baby

टॅग्स