ऊसदरात राज्यापेक्षा गुजरात सरस 

दीपक कुलकर्णी
शनिवार, 7 एप्रिल 2018

नंदुरबार - गुजरात राज्यातील साखर कारखान्यांच्या व्यवहार्य नियोजनामुळे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रतिटन ऊसदर मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना हाच दर सहाशे रुपयांनी कमी मिळत आहे. यासाठी राज्य सरकारचे धोरण जबाबदार ठरत असून, गुजरातचे ऊसदराचे व्यवहार्य मॉडेल राज्यातही राबविल्यास शेतकऱ्यांना जादा ऊसदर देणे शक्‍य होणार आहे. 

गुजरातच्या साखर कारखान्यांना ऊसपुरवठा केल्यानंतर सुरवातीला शेतकऱ्यांना हजार ते एक हजार सहाशे इतका दर दिला जातो. 31 मार्चला सर्व कारखाने साखरसाठा, साखर उत्पादन, उत्पादन खर्च व साखरेला मिळालेला भाव, तसेच पुढे मिळणाऱ्या अपेक्षित दराला अनुसरून ऊसदर जाहीर करतात. दिलेली उचल वजा जाता राहणारी रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू होताना म्हणजेच ऑक्‍टोबर महिन्यात दिली जाते. या पद्धतीमुळे कारखान्यांवर व्याजाचा बोजा पडत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना ऊसदर वाढवून दिला जातो. यामुळे महाराष्ट्रातील सीमेलगतचा ऊस मोठ्या प्रमाणावर गुजरातकडे जात आहे. 

महाराष्ट्राचे गाळप - 84 टन 
गुजरातचे गाळप - 11 टन 
देशाचे एकूण गाळप - 250 टन 

Web Title: Higher rates in Gujarat than Maharashtra