नाशकात साकारली 20000 चौरस फुटांची महारांगोळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

वारकऱ्यांचा अविभाज्य घटक असलेले पखवाज, कलश, वीणा, टाळ यांचाही अंर्तभाव रांगोळीत पहावयास मिळतो. रांगोळीत रेखाटलेले रिंगण व अश्‍व पाहण्यासाठी नाशिकरांची गर्दी होते आहे.

नाशिक शहरातून वाहत असलेल्या गोदावरी नदीकाठी 200 फुट बाय 100 फुट आकारांची भव्य रांगोळी नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्यातर्फे साकारली आहे.

(या रांगोळीचे फोटो फीचर पाहण्यासाठी क्लिक करा)

135 महिला व पुरुषांच्या मदतीने सुमारे 5000 रंग व 3000 किलो रांगोळी वापरण्यात आली आहे.रांगोळीच्या केंद्रस्थानी विठ्ठलाचे रुप असुन त्यानंतरच्या वर्तुळात चंद्रभागेचे पाणी,दिंडी रेखाटली आहे.विठ्ठलाच्या भोवती पितांबराचा पिवळा रंग, तुळशीमाळ, चंदन, कुंकू, बुक्का असे प्रतीक रूप आहे.

वारकऱ्यांचा अविभाज्य घटक असलेले पखवाज, कलश, वीणा, टाळ यांचाही अंर्तभाव रांगोळीत पहावयास मिळतो. रांगोळीत रेखाटलेले रिंगण व अश्‍व पाहण्यासाठी नाशिकरांची गर्दी होते आहे.
(छायाचित्रे : केशव मते, नाशिक)

Web Title: huge rangoli art displayed in nashik