विवाहित महिला रेल्वेतून बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

इगतपुरी - मध्य रेल्वेने ठाणे ते मुरेना (मध्य प्रदेश) असा प्रवास करत असताना कसारा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून महिला बेपत्ता झाली. याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

परवेश सुलतान खान (वय 33) व पत्नी सनद परवेश खान (वय 24; रा. नालासोपारा, जि. ठाणे) हे लष्कर एक्‍स्प्रेस (रेल्वे गाडी क्र.12161) डाऊन कोच क्रमांक एस/9 सीट नं.49/50 वरून ठाणे रेल्वे स्थानकावरून मुरेना (मध्य प्रदेश) येथे जाण्यासाठी निघाले. कसारा रेल्वे स्थानकातून गाडी सुटल्यानंतर फिर्यादी परवेश खान यांची पत्नी सनद खान ही लघुशंकेसाठी जाते, असे पतीला सांगून गेली. मात्र इगतपुरी रेल्वे स्थानक येऊनसुद्धा ती परतली नाही. रेल्वे बोगीच्या बाथरूममध्ये व बोगीत परवेश यांनी पत्नीचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव यांनी कसारा, इगतपुरी, नाशिकरोड, रेल्वे स्थानक परिसरात महिलेचा शोध घेतला, पण ती आढळून आली नाही.