सरपंचपदाच्या इच्छुकांना द्यावा लागणार मालमत्तेचा तपशील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

इगतपुरी - नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना त्यांच्यासह कुटुंबीयांतील सदस्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती द्यावी लागणार आहे, तसेच दाखल गुन्ह्यांची माहिती सादर करणे अनिवार्य राहणार आहे.

राज्यात ऑक्‍टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सध्या सुरू आहे. यंदा सर्व ठिकाणी थेट जनतेमधून सरपंच निवडले जाणार असल्याने निवडणूक आयोगाने त्या दृष्टीने आदेश जारी केले आहेत. यात मालमत्तेची सविस्तर तपशिलासह माहिती देणे अनिवार्य राहणार आहे. राखीव प्रभागातील उमेदवाराला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी लागणार आहे.