सायगाव शिवारातील अवैध लाकुडसाठ्यावर वनविभागाचा छापा

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 25 मे 2018

पिलखोड (चाळीसगाव) - सायगाव शिवारातील नांद्रे रस्त्यालगतच्या शेतातील अवैध लाकुड साठ्यावर वन विभागाने गुरुवारी(ता. 24) सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकला. त्यात सुमारे दीड लाख किमतीचे लाकुड व ट्रक जप्त करण्यात आले.

सायगाव येथील जैनुद्दीन मुल्ला यांच्या नांद्रे रस्त्यावरील शेतात मालेगाव येथील व्यापाऱ्याचा अवैध लाकुड साठा असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार जळगावच्या फिरत्या पथकाने व चाळीसगाव वन विभागाने संयुक्तपणे कारवाई करीत गुरुवारी(ता. 24) सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकला. 

घटनास्थाळी कडुनिंब, आंबा, निलगिरी, बाभूळ आणि सुबाभूळ या झांडाचे सुमारे दीड लाख किमतीचे लाकूड व एक माल वाहतूक ट्रक जप्त केला. संबंधित मालेगाव येथील व्यापाऱ्यावर विना परवानगी वृक्षतोड व विना परवानगी वाहतूक केल्याप्रकरणी वन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. 

चाळीसगावचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे,  जळगावच्या फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल आर. पी घाटोळ, वनपाल आर. एच. ठाकरे, वनपाल सुनिल पवार, ए.बी.जोहरे, प्रकाश  पाटिल, पी.पी.गवारे, अजय महिरे, संजय जाधव, प्रीतम दादा, बाळु शितोळे, श्रीराम राजपूत, नाना सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दोन दिवसांपुर्वी वडाळा येथे अवैध वृक्षतोड वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु आहे. आमचे कर्मचारी देखील परिसरात गस्त घालत आहेत. ग्रामस्थांना कुठे वृक्षतोड होताना आढळल्यास आम्हाला कळवावे.
- संजय मोरे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव.

Web Title: illegal wood stock seized by Forest department