मी विजयी होणार, हे भाकीत केले होते ते खरे ठरले : नरेंद्र दराडे

Narandra-darade2.jpg
Narandra-darade2.jpg

येवला : सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला होता. मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे हे भाकीत केले होते ते खरे ठरले. भाजपाने राष्ट्रवादीला उघडपणे पाठींबा दिला नव्हताच पण असा व्हीपही बजावलेला नव्हता. यामुळे काम सोपे झाले याशिवाय इतर पक्षांसह, आघाड्याच्या व अपक्ष मतदारांच्या गटाने देखील मला साथ दिली असून माझा विजय सर्व पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी असलेल्या सलोख्यामुळे सोपा झाला, आहे अशी प्रतिकीया शिवसेनेचे नाशिक मधील विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली.

  • नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांचा जीवन परिचय

सर्वसामान्य कुटुंबात जन्म, आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना शिक्षण घेत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत नोकरी केली. मात्र समाजसेवेची आवड असल्याने नोकरीचा राजीनामा देत संतोष जनसेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून येवले तालुक्यात गावोगावी काम सुरू केले. गरीबीची जाण असल्याने तळागाळातील जनतेसाठी कार्य केले. यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करीत युवक काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात युवकांची फळी उभी केली. सन १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी करीत येवला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र केवळ २२१ मतांनी पराभव झाला. आमदार होण्याचे स्वप्न त्यावेळी थोडक्यात अपुरे राहिले. त्यांच्या आईलाही त्यांना आमदार झालेले बघायचे होते. मात्र पराभवानंतर दराडे यांच्या मातोश्री आसराबाई यांचे निधन झाल्यामुळे आमदार होताना बघता आले नाही. हे शल्य कायम बोचत असल्याने सन २००४ मध्ये पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे ही गाठ मनाशी ठेवली .परंतु छगन भुजबळ यांची येवला मतदार संघात अचानक एन्ट्री झाल्याने दराडे यांनी ती जागा मोठ्या मनाने आघाडीत भुजबळ यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडली. तेंव्हापासून दराडे आमदार होण्यासाठी उत्सुक होते. सन २०१६ मध्ये शिवसेनेत प्रवेश करीत दराडे यांनी विधानपरिषदेसाठी तयारी चालविली होती. आज शिवसेनेच्या माध्यमातून आमदार होण्याचे दराडे यांचे स्वप्न अखेरीस सत्यात उतरले आहे. 

असा आहे जीवनपट

  • समाजसेवा करण्यासाठी एचएल मधील नोकरी सोडून 1990 मध्ये जनसेवेत
  • संतोष जनसेवा मित्र मंडळाची स्थापना करुन तालुक्यात समाजसेवेत सक्रिय, गावोगावी केल्या शाखा स्थापन
  • 1995 मध्ये येवला पालिकेचे नगरसेवकपदी विजयी
  • जोरदार तयारी करत 1999 मध्ये विधानसभा निकडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढली. मात्र येवला लासलगाव मतदारसंघात अवघ्या 221 मतांनी पराभव
  • 2002 जिल्हा परिषद नगरसुल गटातून पत्नी सुरेखा दराडे यांना निवडून आणले.
  •  पत्नी सुरेखा दराडे यांचीजिल्हा परिषदमध्ये महिला व बालकल्याण सभापतीपदी वर्णी
  •  विधानसभा निवडणुकीची पुन्हा जोमात तयारी पण जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारी मुळे 2004 मध्ये तयारी पण जागा राष्ट्रवादीला सोडल्याने हिरमोड, संधी गेली पण यावेळी भुजबळ विजयात मोलाचा वाटा
  • 2008 मध्ये बंधू रामदास दराडे यांची येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड
  •  2008 मध्ये जिल्हा बँक संचालकपदी जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी विजयी
  •  2012 मध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्याक्षपदी निवड
  •  2014 च्या निवडणुकीत पुन्हा जिल्हा बँक संचालकपदी जिल्ह्यातुन विक्रमी मतांनी विजयी
  • 2014 जिल्हा बँकेच्या संचालकपदी बंधू किशोर दराडे बिनविरोध निवड
  • 2014 ते 2017 या काळात जिल्हा बँकेचे अध्यक्ष
  • 2017 मध्ये राजापूर गटात पत्नी सुरेखा दराडे जि. प.सदस्यपदी विक्रमी मतांनी विजयी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com