कारागृह अधीक्षकाला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

जळगाव - जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डी. टी. डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.

जळगाव - जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डी. टी. डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.

एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या परवानगीसाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यासाठी कैद्याच्या नातेवाईकाला डाबेराव यांनी आपल्या बंगल्यावर दोन हजार रुपये देण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार संबंधित नातेवाइकाने "एसीबी'कडे तक्रार केली व त्यानुसार सापळा रचून आज सकाळी आठ वाजता डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना दोन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.