जळगावात "दशक्रिया' विधी करून चित्रपटाचा निषेध 

protest
protest

जळगाव - प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून नंतर त्याच ठिकाणी दशक्रिया विधी करून "दशक्रिया'चित्रपटाचा जळगावात निषेध करण्यात आला. तसेच रिगल, नटवर चित्रपट गृहातील शो बंद करण्यात आले. 

जळगाव येथे भगवान परशुराम समितीतर्फे "दशक्रिया'चित्रपटाचा निषेध करण्यात आला. महाबळ कॉलनीत चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांची प्रतिकात्मक अत्यंयात्रा काढण्यात आली. त्यानंतर चौकात "दशक्रिया' विधी करण्यात आला. चित्रपटाच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जळगावातील रिगल, नटवर सिनेमागृहाच्या चालकांना निवेदन देण्यात आले. त्या चित्रपटगृहासमोरही घोषणा देण्यात येवून चित्रपटाचे "शो'बंद पाडण्यात आले. निवेदनात समितीने म्हटले आहे, कि "दशक्रिया'चित्रपटात ब्राम्हण समाजाची बदनामी करण्यात आली आहे. चित्रपटातील दृश्‍य आक्षेपार्ह असेच आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राणी पद्‌मावती चित्रपटासही त्यांनी विरोध केला आहे. या चित्रपटातही चुकिचे चित्रीकरण करण्यात आले असून तो चित्रपटही प्रदर्शित करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

भूपेष कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, अशोक साखरे, निलेश कुळकर्णी, चंद्रकांत वैदय, भूषण मुळे, तेजस जोशी,गजानन जोशी, अजय जोशी, अजय डोहळे, हेमंत जोशी, आदीनी आंदोलनात सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com