उंबरखेडला वीज कोसळून बैलाचा मृत्यू

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

झाडावर वीज पडली आणि त्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. जवळ असलेल्या दुसऱ्या बैलाला विजेचा धक्का बसल्याने तो जमिनीवर पडला.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : उंबरखेड शिवारात झालेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. तर पिंपळवाड म्हाळसा रस्त्यावरील शेतात वीज पडून बैलाचा मृत्यू झाला. ही घटना काल (ता. 7) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत शेतकरी सुखरूप बचावला

उंबरखेडसह परिसरात काल (ता. 7) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी कल्याणसिंग इंद्रसिंग राजपूत यांचे पिंपळवाड म्हाळसा रस्त्यावर शेत आहे. त्यांच्या शेतातील झाडाला बैलांना बांधले होते.

कल्याणसिंग राजपूत हे एका बैलाला जवळ असलेल्या शेडमध्ये बांधण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी झाडावर वीज पडली आणि त्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. जवळ असलेल्या दुसऱ्या बैलाला विजेचा धक्का बसल्याने तो जमिनीवर पडला. मात्र, काहीवेळाने बैल उठून उभा राहिला. कल्याणसिंग राजपूत हे देखील तेथेच जवळ उभे होते. सुदैवाने ते या घटनेतून बचावले असून सुखरूप आहेत. दरम्यान, झालेल्या नुकसनाची भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :