मालमत्तेच्या वाटणीवरून एकावर कुऱ्हाडीने वार; गुन्हा दाखल

दीपक कच्छवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

योगेश महाले याने मारहाण करून शिवीगाळ केली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : वडिलोपार्जित संपत्तीच्या हिस्सा वाटणीवरून चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथे एकास खांद्यांवर कुऱ्हाड मारून दुखापत केल्याची घटना नुकतीच घडली असून, एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कुंझर (ता. चाळीसगाव) येथील भिकन महाले यांच्या वडिलोपार्जित हिस्सा वाटणीच्या कारणावरून योगेश महाले याने मारहाण करून शिवीगाळ केली. हातात कुऱ्हाड घेऊन भिकन महाले यांच्या डाव्या खांद्यावर दुखापत केली.

या प्रकरणी भिकन महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश महाले यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पंकज पाटील हे करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :