चाळीसगाव : पिलखोड शिवारात आढळले दोन बिबटे

बिबट्याचे ठसे आढळले पिलखोड
बिबट्याचे ठसे आढळले पिलखोड

पिलखोड (ता. चाळीसगाव) : येथील शेती शिवारात गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांना व शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. यामुळे शेतात जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सायगाव व काकळणे भागात केलेल्या हल्ल्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा पिलखोड शिवाराकडे वळविला आहे. काही दिवसांपूर्वीच अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. चाळीसगाव रस्त्यालगत व देशमुखवाडी रस्त्यालगतच्या शेतांमध्ये बिबट्याला पाहिल्याचे शेतकरी व शेतमजुरांनी सांगितले. 

शेतात सध्या कामाचे दिवस सुरु आहेत. त्यात बिबट्याच्या भीतीपोटी कोणीच शेतात जाण्यास धजावत नाही. शेतात दिवसांतून दोन तीनवेळा बिबट्या आढळल्याच्या घटना घडतात. गुरुवारी (ता. 31) पिंपळवाड म्हाळसा शिवारात वासरुला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी आहे. या हल्ल्यामुळे तर परिसरात अधिकच भीती निर्माण झाली आहे.  दरम्यान तामसवाडी व पिलखोड येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यापासून संरक्षण करण्यासंदर्भातील पत्रके जरी वाटली असली, तरी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com