बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीपंप विजेच्या वेळात बदलाची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पिलखोड (ता. चाळीसगाव) : पिलखोड भागातील शेतीपंपांना रात्रीच्या वेळी वीज दिली जाते. त्यात सध्या या परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शेतात रात्रीच्या वेळी कोणीही जात नाही. परीणामी रात्री पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने विजेच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परिसरातील सर्वच फिडरवरील शेतीपंपांना आठवड्यातील तीन ते चार दिवस रात्रीच्या वेळी वीज दिली जाते. ज्या परिसरात बिबट्याची जास्त भीती आहे, अशा सायगाव फिडरवर रविवार ते बुधवार रात्री साडेअकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत व गुरूवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज दिली जाते. शिवाय बिबट्याच्या दहशतीमुळे शेती शिवारात दिवसासुद्धा कोणी फिरकत नाही.

काही शेतकऱ्यांनी गव्हाची व कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे नुकत्याच लागवड केलेल्या गव्हाला व इतर पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना मिळत असलेल्या विजेमुळे पिकांना पाणीच देता येत नसल्याने पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी काही वेळा मजुरांना पाठवावे लागते. 

आठवड्यातील काही दिवस सकाळी नऊपासून पाचपर्यंत वीज दिली जाते. परिणामी मजुर हे पहाटेपासून अतिरीक्त रोजंदारीची मागणी करतात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. जर नऊ ऐवजी दहापासून वीज दिली तर, मजुरांना देखील जास्त मजुरी द्यावी लागणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पूर्वीच्या वेळेप्रमाणे वीज द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.  यापूर्वी सायगाव फिडरवर रविवार ते बुधवार रात्री दोन ते सकाळी दहा वाजेपर्यंत तर गुरुवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज मिळायची. यामुळे पिकांना पाणी देण्याचे व्यवस्थित नियोजन होत होते. त्यामुळे यापूर्वीच्या वेळेनुसार वीज वितरण कंपनीने वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

परिसरात बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी कमालीचे घाबरले आहेत. शेतकरी दिवसा पिकांना पाणी देतात. मात्र, पिके सुकू नयेत म्हणून रात्रीच्या सुमारास आपल्या जिवाची जोखीम पत्करून काही शेतकरी शेतात जातात. त्यामुळे शासन आमच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com