पारोळ्यात घर कोसळून चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

जळगाव - पारोळा शहरातील काझी वाडा परिसरात मातीचे घर कोसळून ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.

चादरीचा व्यवसाय करणारे काझी कुटुंब या वाड्यात राहत होते. जीर्ण झालेल्या मातीच्या घराचे छत कोसळल्याने ही घटना घडली आहे. यात कुटुंबातील चार जण मरण पावले, तर एक जण सुदैवाने बचावला.

पहाटे छत कोसळले तेव्हा घरातील सर्व जण झोपेत होते. छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने हाशिम काझी, सायराबी काझी, मोइनोद्दीन काझी आणि शबिनाबी काझी या चार जणांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.