भरधाव दुचाकीची स्कूटीला धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

चिमुरडी जखमी; पोलिसपुत्राची तरुणींना धमकी

जळगाव - न्यायालय चौकातून महाबळकडे जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणीच्या स्कूटीला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. त्यात सातवर्षीय चिमुरडीच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अपघातादरम्यान दुचाकीस्वार पोलिसपुत्राने तरुणीला तुझ्या कानशिलात मारेल, असे धमकावल्याचे तरुणीने सांगितले.

नेहरूनगरातील दिया दीपक पोरवाल स्कूटीने (एमएच १८, ए ३५९१) सायंकाळी घरी जात होती. नंदिनीबाई महाविद्यालयाच्या चौकात विनानंबरप्लेट दुचाकीस्वार पोलिसपुत्राने तिच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यात सातवर्षीय कार्तिकी प्रशांत पोरवाल दुभाजकावर फेकली गेली. त्यात तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ कार्तिकीला उचलून जवळच असलेल्या जावळे हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. बालिकेवर तातडीने उपचार करण्यात आले. अपघातात दिया पोरवाल आणि पोलिसपुत्र सनी सुनील पाटील हादेखील किरकोळ जखमी झाला.

पोलिसपुत्राची अरेरावी
भरधाव दुचाकीस्वार सनी पाटीलने दियाच्या स्कूटीला धडक दिल्यानंतर कार्तिकी रस्त्यावर कोसळली. सोबतच तिची मैत्रीण दुसऱ्या दुचाकीवर होती. तिने सनी पाटीलला उद्देशून ‘तूला दिसत नाही का...’ असे म्हणताच त्याने तुझ्या कानात देईल, असे उद्दामपणे रागवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांना नियम नाहीत का?
पोलिसपुत्र सनी पाटील याच्या पल्सर दुचाकीवर नंबरप्लेटवर ‘नायकी शूज’चे सिम्बॉल होते. नंबर मात्र नव्हताच आणि वर ‘पोलिस’ लिहिलेले असल्याने अपघात घडल्यानंतर पोलिसांना नियमच नाहीत काय, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.

Web Title: jalgaon news accident