‘एसटी’ने दुचाकीस्वारास नेले शंभर फूट फरफटत

जळगाव - विद्युत कॉलनी थांब्याजवळील महामार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातात बसखाली अडकलेली दुचाकी.
जळगाव - विद्युत कॉलनी थांब्याजवळील महामार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातात बसखाली अडकलेली दुचाकी.

जळगाव - शहरातील विद्युत कॉलनी थांब्याजवळील हॉटेल बावर्चीसमोर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वारास शंभर फूट फरफटत नेले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने रस्त्याच्या कडेला बस उतरविली. पुन्हा महामार्गावर बस घेतल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार बसखाली आला.

शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग   आता मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रत्येक दिवशी किमान एकतरी अपघात होऊन आठवड्याला तीन निरपराध वाहनधारकांना जीव गमवावा लागतो. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जळगाव- कानळदा- पळसोद बस (एमएच १४, बीटी ०४१७) घेऊन चालक बळवंत रामदास साळुंखे नवीन बसस्थानकातून निघाले. प्रभात कॉलनी मार्गे गुजराल पेट्रोलपंपाच्या दिशेने बस जात असताना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे बससमोर एक सायकलस्वार आला. चालकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस साईडपट्ट्यांवर उतरवून पुन्हा महामार्गावर आणली. इतक्‍यात समोरून मोटारसायकलवर (एमएच १९, बीटी ११४२) येत असलेल्या अमृत माणिक पाटील  (वय ४८) यांच्यासह दुचाकी बसखाली येऊन चालकाने शंभरफुट महामार्गावर फरफटत नेले. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड करून बस थांबवल्यावर अपघात झाल्याचे चालकाला सांगितले. मात्र, चालक कुठयं...असं अनभिज्ञपणे उत्तरल्यावर संतप्त नागरिकांनी चाकाखाली असे म्हणताच बसखाली पुढच्या चाकात अडकलेल्या अमृत पाटील यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

तरुणांची तत्परता 
अमृत बडगुजर दुचाकीसह बसखाली अडकल्याने त्यांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढल्यावर पवन फेगडे व चेतन कावडे या दोघा तरुणांनी तत्काळ बांभोरीकडून येणाऱ्या खासगी बसला थांबविले. त्याच बसमध्ये टाकून जखमी बडगुजर यांना आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल येथे आणण्यात आले. 

दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प 
सायंकाळी पावणे सात वाजेची वेळ महाविद्यालये, क्‍लासेस सुटण्याच्या वेळी या महामार्गावर प्रचंड गर्दी असते. विद्युत कॉलनी स्टॉपवर हॉटेल बावर्ची येथे अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. त्यात बांभोरीकडून येणारा वाळूडंपर या गर्दीतच नादुरुस्त होऊन अडकल्याने आणखीनच अडचण झाली. घटनेची माहिती मिळताच  पोलिस निरीक्षक बी. जी. रोहोम रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com