विमानसेवा सुरू करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जळगाव - ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून सुरू होणाऱ्या विमान वाहतुकीसाठी आवश्‍यक त्या सुरक्षेचा आज प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी आढावा घेतला. विमानतळावरून सप्टेंबरपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार असून, त्यादृष्टीने तयारीची माहिती या बैठकीत घेण्यात आली. 

जळगाव - ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून सुरू होणाऱ्या विमान वाहतुकीसाठी आवश्‍यक त्या सुरक्षेचा आज प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी आढावा घेतला. विमानतळावरून सप्टेंबरपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार असून, त्यादृष्टीने तयारीची माहिती या बैठकीत घेण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव ते मुंबई अशी विमानसेवा सेवा १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या विमानसेवा वाहतुकीपूर्वी तेथील सुरक्षेबाबत आज प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यात विमानतळ ठिकाणी अग्निशमन सेवा, पोलिसांचे युनिट, सुरक्षेबाबतच्या सुविधा तसेच मागील काळातील आवश्‍यक त्या मुद्यांसंदर्भात सूचना करण्यात आल्याचे प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. विमानतळ वाहतुकीसाठी ज्या सुविधा लागणार आहेत त्यांची व्यवस्था देखील लवकरच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी किमान आवश्‍यक कर्मचारी भरतीच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असून ऑगस्टमध्ये ती पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी योगेश शेंडे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत....

02.00 PM

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी...

02.00 PM

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून...

02.00 PM