'दशक्रिया'चे सर्वच शो बंद!

'दशक्रिया'चे सर्वच शो बंद!

जळगाव: ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित "दशक्रिया' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात दाखविण्यास विरोध झाल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी शो बंद ठेवण्याचा निर्णय चित्रपट गृह चालकांनी घेतल्याने एक देखील शो झाला नाही.

"पद्मावती' या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वाद उद्‌भवल्याने हा चित्रपट प्रदशित करण्याची तारीख पुढे लोटण्यात आली आहे. याप्रमाणेच वादग्रस्त ठरलेल्या "दशक्रिया' या चित्रपटातील काही आक्षेपार्ह प्रसंग व त्यांच्या चित्रीकरणावरुन वादंग निर्माण झाले आहे. "दशक्रिया' चित्रपटातील काही प्रसंगांमुळे विशिष्ट समाजाची बदनामी व ते प्रसंग भावना दुखावणारे आणि प्रथा-परंपरांची बदनामी करणारे असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याबाबत याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्याने शुक्रवारी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण, यानंतर देखील प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांचे शो बंद पाडण्यात आले होते.

दिवसभर शो बंदच
"दशक्रिया' चित्रपट प्रदर्शनानंतर शहरातील आयनॉक्‍स, रिगल व नटवर मल्टीप्लेक्‍स या चित्रपट गृहांमध्ये शो सुरू करण्यात आले होते. परंतू, सलग दोन दिवस विरोध करत शो बंद पाडल्याचे प्रकार घडल्यानंतर आजच्या दिवशी चित्रपटाचा एक देखील शो सुरू न करण्याचा निर्णय चित्रपट गृह चालकांकडून घेण्यात आला. त्यानुसार तिनही चित्रपटगृहांमध्ये आजचे सर्वच शो रद्द करण्यात आले होते.

तिकिट बुकिंगही थांबली
चित्रपट प्रदर्शनानंतर शो पाहण्यासाठी सिटचे आरक्षण करण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या तीन दिवसांच्या शोसाठी बुकिंग झाले असताना विरोध झाल्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्यांना चित्रपट न पाहताच परत जावे लागले होते. यामुळे निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी तीनही चित्रपटगृहांचे ऑनलाईन तिकिट बुकिंग बंद करण्यात आल्याचे नटवर मल्टिप्लेक्‍सचे इंद्रवदन त्रिवेदी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com