उद्योगपतीच चालवत आहे सरकारः रघुनाथदादा पाटील

raghunath dada patil
raghunath dada patil

चोपडा (जळगाव): आताचे सरकार व यापूर्वीचे आघाडीचे सरकार दोन्ही ही धोरणात्मक दृष्ट्या सारखेच आहेत. आताचे सरकार अंबानी तर यापूर्वी आघाडीचे सरकार टाटा बिर्ला चालवीत होते. यामुळे उद्योगपतीच सरकार चालवीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज (सोमवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

चोपडा येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेस सुकाणू समिती सदस्य गणेश जगताप, किशोर दमाले, कैलास खंडबहाल, कवी राजेंद्र सोनवणे, चोपडा येथील कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील, शेतकरी संघटनेचे डॉ. प्रकाश पाटील, किरणसिंग राजपूत, डॉ. रवींद्र निकम आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की कर्जमाफीच्या नादात शेतकरी वाट पाहत राहिले. याद्या लावल्या, पण यात काहींचे नावे आले, तर काहींचे आले नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या "भिक नको कुत्रं आवर' अशी अवस्था शेतकऱ्यांची सरकारने केली आहे. जूनला कर्जमाफी योजना जाहीर केली; खरिपाचा तसेच रब्बीचा हंगाम गेला तरी खात्यात पैसे नाही शेतकरी कर्जमाफीवर आता कविता, लेख सुरू झाले आहेत. ऊसाची रिकव्हरी चांगली असूनही भाव नाही. कारखानदार व सरकार यांचे साटेलोटे आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला.

राज्यात सात कोटी टनाचे सरासरी गाळप होते. यात कमी भावपोटी एक हजार टनाचे पैसे शेतकऱ्यांना कमी मिळत असून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. या राज्यात मगर, बिबट्या, वाघ, कुत्र्याला संरक्षण आहे, मात्र माणसांना संरक्षण नाही. प्राणीमित्रांनी हैदोस घातला आहे गोवंश हत्याबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पशुधन कायद्याच्या बाहेर होते धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांची अवस्था कोलमडली. आमच्यासाठी गुरांचा गोठा म्हणजे आमचे एटीएम कार्ड होते, उत्पादकता कमी झाली, चारा महाग झाल्याने, जनावरे वागणे जिकरीचे झाले आहे. देशातील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्या. शहरी, ग्रामीण, दरी कमी केली. शेतकरी व्यापारी यांच्यातील अंतर ही कमी केले असे ही सुकाणू समितीचे सदस्य व शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com