चाळीसगाव घाटात दुचाकीधारकांची जीवघेणी कसरत

संजय जाधव
रविवार, 3 सप्टेंबर 2017

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ता. २६ आॅगस्ट रोजी झालेल्या प्रचंड पावसाने घाटातील म्हसोबा मंदिराजवळ रस्ता खचला होता. प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक त्वरित बंद करण्याचे आदेश काढले. मात्र तरीही काही चार चाकी व् दुचाकी वाहनांची वाहतूक येथून सुरूच होती.

कन्नड (जि. औरंगाबाद) : पावसामुळे रस्ता खचल्याने चाळीसगाव घाटतील रस्ता प्रशासनाने बंद केला आहे.मात्र पोलीस व् प्रशासनाला न जुमानता अनेक दुचाकीधारक येथून जीवघेणा प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ता. २६ आॅगस्ट रोजी झालेल्या प्रचंड पावसाने घाटातील म्हसोबा मंदिराजवळ रस्ता खचला होता. प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक त्वरित बंद करण्याचे आदेश काढले. मात्र तरीही काही चार चाकी व् दुचाकी वाहनांची वाहतूक येथून सुरूच होती. पोलिसांनी येथून जाण्यास नकार दिला तरीही त्यांना न जुमानता हे प्रवासी येथून प्रवास करात होते.

मागील आठवड्यात येथे दुरुस्तीचे काम सुरु झाले. यावेळी कपारीपर्यंत पूर्ण रस्ता खोदण्यात आला. शेवटी शिल्लक राहिला फ़क्त नालीचा कठडा. आता या कठड्या वरूनही दुचाकी वाहनांची जीवघेणी कसरत सुरूच आहे. ही वाहतूक त्वरित बंद करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्र

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत....

02.00 PM

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी...

02.00 PM

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून...

02.00 PM