चाळीसगाव: गिरणा धरणाचा वीज पुरवठा सुरळीत

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

'सकाळ बातमीचा परिणाम'

पिलखोड (ता. चाळीसगाव) : बिल थकल्यामुळे गिरणा धरणावरील वीजपुरवठा वीज कंपनीतर्फे खंडित करण्यात आला होता. यासंदर्भात 'सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची तातडीने दखल घेत शुक्रवारी (ता. 29) वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे धरणाच्या सूत्रांनी सांगितले.

गिरणा धरणावर नांदगाव (जि. नाशिक) येथून वीजपुरवठा केला जातो. धरणाचे सुमारे सहा महिन्यांचे वीजबिल थकले होते. परिणामी बिल न भरल्यामुळे वीज कंपनीतर्फे बुधवारी (ता. 27) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. जवळपास दोन दिवस येथे वीज नव्हती. काही महत्वाच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना जनरेटरची मदत घ्यावी लागली.

यासंदर्भात 'गिरणा धरणाचा वीजपुरवठा खंडित' या मथळ्याखाली 'सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत गिरणा पाटबंधारे विभागाने थकलेले बिल भरून शुक्रवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत करून घेतला, असे धरणाच्या सूत्रांकडून कळाले.