चाळीसगाव ते जळगाव जाणे होईल वेगवान

road
road

भडगाव : जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर ( सविस्तर प्रकल्प अवहाल ) मंजुरीसाठी केंद्राच्या रस्ते वाहतुक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. सुरवातीला जळगाव ते भडगाव व भडगाव ते चाळीसगाव या 103 कीलोमीटरच्या दोन टप्प्यांचा डीपीआर पाठविण्यात आला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सांगितले. या दोन टप्प्यांना केंद्राकडुन मंजुरीची प्रतिक्षा आहे. हा रस्ता झाल्यास चाळीसगाव ते जळगाव जाणे वेगवान होणार आहे. तर या रस्त्याला नऊ ठीकाणी बायपास असणार आहे.

चाळीसगाव ते जळगाव हा राज्य मार्ग क्रमांक 19 चे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्ग 156 मधे झाले आहे. त्याबाबत राजपत्रही घोषित  करण्यात आले आहे. चाळीसगाव पासुन नांदगाव, मनमाड वरून चांदवड पर्यंत हा महामार्ग असणार आहे. यांची लांबी साधारणपणे 200 कीलोमीटर आहे. 

डीपीआर केंद्राकडे सादर
चांदवड ते जळगाव या दोनशे कीलोमीटर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्ता चौपदरी करण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. सुरवातीला जळगाव ते भडगाव व भडगाव ते  चाळीसगाव या 103 कीलोमीटर अंतरराच्या दोन टप्प्याचा डीपीआर मंजरीसाठी केंद्राकडुन पाठविण्यात आला आहे.  राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याचे सर्वेक्षण करून याचा डीपीआर ( सविस्तर प्रकल्प अवहाल) मंजुरीसाठी केंद्रीय रस्तेवाहतुक मंत्रालयात दाखल करण्यात आला आहे. त्याला केंद्राकडुन मंजुरीची प्रतिक्षा आहे. मंजुरीच्या दृष्टीने हालचालीनी वेग घेतला आहे. तर चाळीसगाव ते चांदवड याचा ही डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे.

भुसंपादनाची प्रक्रिया लवकरच
रस्त्यासाठी आवश्यक जमीनी ही हस्तांतरणाची प्रक्रिया लककरच सुरू  करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्याबाबतच्या हरकतीचा निपटारा सुरू आहे. मात्र ज्या ठीकाणाहुन बायपास जाणार आहेत. त्या जमिनीची हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात येणार नाही.  सुरवातीला फक्त सध्याच्या रस्त्याच्या शेजारील जमीनीचे हस्तांतरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. 

असा असेल राष्ट्रीय महामार्ग
चांदवड ते जळगाव हा दोनशे कीलोमीटरचा मार्ग असणार आहे.    हा चारपदरी मार्ग असेल त्यात प्रत्येकी दहा मीटरचे जाण्यायेण्यासाठी मार्ग असेल. दोन्ही रस्त्यांमधे दुभाजक असणार आहे. हा महामार्ग बीओटी तत्वावर असेल. चाळीसगाव ते जळगाव या दरम्यान एकुन नऊ ठीकाणी या रस्त्याला बायपास राहतील. या महामार्गाचे जळगाव ते भडगाव हे अंतर 56. 2 कीलोमीटर तर भडगाव ते चाळीसगाव 46.8 कीलोमीटर असेल. 

असे आहेत बायपास
गावाचे नाव.......बायपासचे अंतर (किलोमीटरमध्ये)
शिरसोली...........3.5
पाथरी...............1.5
सामनेर..............1
पाचोरा...............9
भडगाव.............3.3
कजगाव.............1
वाघळी...............1.3
पातोडें...............1.45
चाळीसगाव.........5.5

चाळीसगाव ते जळगाव वेग वाढेल
जळगाव जिल्ह्याचा चाळीसगाव हा शेवटचा तालुका. दोघांचे अंतर  शंभर कीलोमीटर पर्यंतचे आहे. चाळीसगावच्या व्यक्तीला जळगाव बसने जायचे म्हटले तर तीन तास लागतात. मात्र राज्य महामार्ग क्रमांक एकोणीस हा आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वेग वाढण्यास मदत होणार आहे. तर नाशिक, मुबंईला जाणेही सोयीचे होणार आहे. याशिवाय या भागाच्या औद्योगिक विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होऊ शकणार आहे. 

जळगाव ते चांदवडच राष्ट्रीय महामार्गाच्या जळगाव ते भडगाव व भडगाव ते चाळीसगाव टप्प्याचा डीपीआर तयार करून केंद्राच्या रस्तेवाहतुक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर पुढील कामाला गती देण्यात येईल. 
- सी.आर. सोनवणे, उपअभियंता  राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com