‘उमवि’ व्यवस्थापन परिषदेवर दोन्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राधिकरणाच्या विविध गटांसाठी झालेल्या निवडणुकीत व्यवस्थापन परिषदेच्या गटातील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे आमदार डॉ. सतीश पाटील व ॲड. संदीप पाटील यांनी बाजी मारली. त्यांच्यासह लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, तळोदा विद्याप्रसारक मंडळाचे भरत माळी विजयी झाले, तर धुळे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेश घुगरी यांचा पराभव झाला.

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राधिकरणाच्या विविध गटांसाठी झालेल्या निवडणुकीत व्यवस्थापन परिषदेच्या गटातील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे आमदार डॉ. सतीश पाटील व ॲड. संदीप पाटील यांनी बाजी मारली. त्यांच्यासह लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, तळोदा विद्याप्रसारक मंडळाचे भरत माळी विजयी झाले, तर धुळे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेश घुगरी यांचा पराभव झाला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अधिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी (ता. १९) १९ केंद्रांवर मतदान झाले होते. या मतदानाची मोजणी आज विद्यापीठातील शिक्षण भवनात करण्यात झाली. सकाळपासूनच उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी केली होती. प्रसंगी व्यवस्थापन परिषद गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. विद्यापीठ प्रशासनाकडून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र ते पूर्ण झाले नाही. तरी देखील प्राचार्य गटातील दहा जागा,  विद्या परिषदेच्या तीन, 

विद्यापीठ प्राध्यापक गटाच्या दोन जागा व व्यवस्थापन मंडळातील सहा जागांपैकी एक जागा अशा एकूण सोळा जागा बिनविरोध करण्यात आल्या विद्यापीठाला यश मिळाले. 

राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये यशस्वी लढत
निवडणुकीसाठी व्यवस्थापन परिषद व महाविद्यालयीन प्राध्यापक गटात चांगलीच चुरस पहायला मिळाली. यावेळी व्यवस्थापन परिषदेच्या गटात सर्वच राजकीय पक्षातील नामवंत लोकांनी अर्ज दाखल केले होते. यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतीश पाटील हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याने या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. व्यवस्थापन परिषदेसाठी चार जागा असल्याने हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असलेली अखेर ही लढत यशस्वी पार पडल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

मत वाटपावरुन रंगला वाद
व्यवस्थापन परिषद गटातील मतमोजणीत पहिल्या फेरीत भरत माळी आणि संदीप पाटील हे विजयी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीत आमदार सतीश पाटील यांना १७ मते पडली. विजयासाठी १८ मतांची आवश्‍यकता असल्याने पहिल्या फेरीतील विजयी उमेदवारांच्या कोट्यातील म्हणजेच भरत माळींच्या कोट्यातील एक मत नियमानुसार आमदार सतीश पाटील यांना देण्यात आल्याने ते विजयी ठरले. यावर माजी अधिसभा सदस्य दिलीप रामू पाटील यांनी आक्षेप घेतला होता. यावर डॉ. पाटील यांनी याबाबत निवडून येण्याअगोदर आक्षेप घ्यायला पाहिजे निवडून आल्यानंतर आक्षेप का घेता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे यामुळे काहीवेळ गोंधळ झाला. प्रसंगी काहीवेळाने उपस्थितांनी हा वाद मिटविला.

चार जागांसाठी दोन गटात टक्कर
व्यवस्थापन परिषदेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. यात ८७ उमेदवारांनी मतदान केले होते. पाच उमेदवारांपैकी दिलीप रामू पाटील यांच्या गटातील चार उमेदवार रिंगणात होते. तर आमदार डॉ.सतीश पाटील हे स्वतंत्र गटातून निवडणूक लढवित होते. सुरवातीला व्यवस्थापन परिषदेची ही निवडणूक दिलीप रामू पाटील यांचे सदस्य बिनविरोध करतील हे जवळपास निश्‍चित होते. मात्र डॉ.सतीश पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत राजकीय रंगत आली व दोन गटात काट्याची टक्कर झाली. यात महेश घुगरे वगळता सर्व उमेदवार विजयी झाले.