भांडण सोडविणाऱ्यालाच भोसकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

जळगाव - माध्यमिक शाळेत दोन विद्यार्थ्यांच्या दोन टोळक्‍यांत आर. आर. विद्यालयाजवळ तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. शिवीगाळ, हाणामारी आणि त्यातही चाकू, सुऱ्या व चॉपरचा वापर झाल्याने खळबळ उडाली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर बुलेटस्वार तरुणांनी हल्ला चढवून जखमी केले. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुण जुन्या जळगावच्या तरुण कुढापा मित्रमंडळाचा अध्यक्ष संदीप भावसार असल्याचे कळल्यानंतर जुने जळगावातील संतप्त तरुणांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

शहरातील आर. आर. विद्यालयाजवळील मेडिकलसमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. एक गट तरुणाला बेदम मारहाण करीत असतानाच पिंप्राळा येथून काम  आटोपून घराकडे जात असताना तरुण कुढापा मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप चंद्रकांत भावसार (वय ३३) यांना भांडण होताना दिसल्याने त्यांनी मध्यस्थी करीत मार खाणाऱ्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मार खाणाऱ्या तरुणाच्या गटातील असल्याचा संशय होऊन दोघांनी आपल्या जवळील चाकू काढत संदीप भावसार यांच्यावर हल्ला चढवला. चाकूने भोसकून दोघेही मारेकरी दुचाकी (क्र. २१२१ बुलेट ) वरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी संदीपला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती रात्री उशिरापर्यंत स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

पोलिसांची घटनास्थळावर धाव 
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे ललित पाटील, रवींद्र वंजारी, अल्ताफ पठाण, शेखर पाटील घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने जमाव रस्त्यावर एकवटाला असल्याने गर्दी पांगवून त्यांनी जिल्हा रुग्णालयात जखमीला विचारपूस केल्यावर पराग लोहार (रा.औद्योगीक वसाहत), ऋुतीक जैस्वाल (रा. शिवाजीनगर) या दोघांना रात्री साडेनऊला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

जिल्हा रुग्णालयात गर्दी 
तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष संदीप भावसार यांच्यावर चाकूहल्ला झाल्याची माहिती कळताच जुने जळगावातील मंडळ कार्यकर्त्यांसह रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. 

यापूर्वीही चॉपर हल्ला
ताब्यात घेतलेल्या तरुणांमधील पराग लोहार याने यापूर्वीही ख्वाजामियाँ चौकात एकावर चॉपरने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. चॉपरने हल्ला करताना ताब्यात घेतलेल्या दोघांसोबत आणखीन इतर चार-पाच विद्यार्थी होते, तसेच समोरच्या गटातील तो, मार खाणारा विद्यार्थी आणि त्याच्या गटाची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

Web Title: jalgaon news crime