उमर्टीत कट्टे बनविणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

उमर्टीत कट्टे बनविणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव - सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वैजापूर परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयितास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून काडतुसांसह लोडेड तीन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्या. अटकेतील संशयित मध्य प्रदेश हद्दीतील सातपुडा पर्वतातील दुर्गम उमर्टी या गावात बंदुका बनविण्याचा कारखाना चालवत असल्याचा पथकाला संशय असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगांचा विस्तीर्ण दुर्गम प्रदेश आहे. बहुतांश डोंगरपायथ्याचा फार अल्प परिसर जिल्ह्याच्या सीमेत मोडतो. उर्वरित पुर्वतमाळ मध्यप्रदेश राज्यात मोडते.

मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील उमर्टी हे चारही बाजूने पर्वतांनी वेढलेले दऱ्या-खोऱ्यात वसलेले गाव आहे. संपूर्ण गावात सिकलगर समुदायाचे लोखंडी हत्यारे बनविण्याचे घरगुती कारखाने आहेत. येथील रहिवासी अजयसिंग कल्याणसिंग बरनाला (वय २१) हा गावठी कारखान्यात तयार केलेल्या रिव्हॉल्वर बनविणे व विक्रीच्या बेकायदा उद्योगात आहे. जळगाव जिल्ह्यात येथूनच गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणावर बेकायदा शस्त्रपुरवठा केला जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर अधीक्षक बच्चनसिंग, प्रशांत बच्छाव, सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकाने गेल्या महिन्यापासून खबऱ्या पेरून रिव्हॉल्वर विक्रेत्याचा शोध घेणे सुरू केले होते. पथकातील मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, नारायण पाटील, रवींद्र गायकवाड, मनोज दुसाने यांच्या प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांच्या जोड्या विक्रेत्याशी मोबाईलवर संपर्कात होते. त्याला ग्राहक म्हणून वैजापूर गावात बोलावण्यात आले होते. अजयसिंगला तीन रिव्हॉल्वरची ऑर्डर दिल्यावर तो विक्रीच्या उद्देशाने घेऊन आला. ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडून रिव्हॉल्वरचा सौदा करतानाच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. अजयसिंगच्या कंबरेत तीन गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वर आणि सोबत जिवंत काडतुसे असा ८३ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हेशाखा तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com