दीपोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात "भाऊबीज' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जळगाव - दीपोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा असलेला भाऊबीज सण आज पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. घराघरांत बहिणींनी आपल्या लाडक्‍या भाऊरायाचे औक्षण केले. भावाने बहिणीला भेटवस्तू दिली तर सणानिमित्त सर्वत्र गजबज होती. 

जळगाव - दीपोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा असलेला भाऊबीज सण आज पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. घराघरांत बहिणींनी आपल्या लाडक्‍या भाऊरायाचे औक्षण केले. भावाने बहिणीला भेटवस्तू दिली तर सणानिमित्त सर्वत्र गजबज होती. 

सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंतच्या साऱ्यांनाच हवाहवासा वाटणारा दीपोत्सव गेले पाच दिवस सुरू होता. वसुबारसपासून उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर अनुक्रमे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा साजरा झाला. तर नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांच्या सणानिमित्त गावी भेटीगाठी होत असल्याने सण पर्वणीच ठरतो. लक्ष्मीपूजनानंतर सासुरवाशीण माहेरी आल्या आहेत. बसस्थानक व रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांची दिवसभर रेलचेल होती. तसेच 

भाऊबीजला देण्यात येणाऱ्या भेटवस्तू खरेदीसाठी बाजार गर्दीने गजबजून गेलेला होता. कपड्यांच्या दुकानांत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. टॉवर चौक व महात्मा फुले मार्केटमधील कपड्यांच्या दुकानांतही विशेष गर्दी होती. मुख्य रोडवरील कपड्यांची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती. भेटवस्तूंच्या दुकानांमध्येही गर्दी होती. काहींनी आपल्या लाडक्‍या बहिणीसाठी सोन्याचे दागिनेही खरेदी केले. 

रेल्वे-बसस्थानक गर्दी 
भाऊबीजनिमित्त भावाच्या भेटीसाठी बहिणींनी माहेरची वाट धरली. त्यातच आज एसटीचा सकाळी संप संपल्याने बसस्थानकावर देखील गर्दी होती. तसेच रेल्वेस्थानक ते खासगी प्रवासी वाहतुकीला देखील आज गर्दी पाहावयास मिळाली.