वरखेडे येथे मोकाट कुत्र्यांनी पाडला वासराचा फडशा

दीपक कच्छवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कुत्र्याचा बंदोबस्त होणे गरजेचे
​अलिकडच्या काळात शेतकर्यांच्या पशुधनावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी बिबट्या तर कधी मोकाट कुत्रे गुरांचा फडशा पाडतात. यामुळे परिसरात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा प्राण्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी मागणी केली आहे.

मेहुणबारे( ता चाळीसगाव ) : येथुन जवळ असलेल्या वरखेडे( ता चाळीसगाव) येथे मोकाट कुत्र्यांच्या घोळक्याने दरेगाव रसत्यादरम्यान असलेल्या शेती शिवारात वासराचा फडशा पाडल्याने वासरु ठार झाले. ही घटना काल शनिवारी (ता. 2)  पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले असुन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी असलेले  शायसिंग झिपरू पाटील यांची दरेगाव रस्त्यालगतच्या माळरानावरील शेती आहे. शेतात गुरे बांधलेली होती. शिवाय जवळच तांडा लोकवस्ती असल्याने मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणावर आहेत. या कुत्र्यांनी शनिवारी (ता. 2) पहाटे तीन वाजेच्या सुमारास सहा महिन्याच्या   वासरावर  हल्ला करुन फडशा पाडला. ही घटना सकाळी सहा वाजता शेतात गेलेल्या नाना कच्छवा व रमेश कच्छवा यांच्या लक्षात आली. सुरवातीला त्यांना हा हल्ला बिबटय़ाने केला असल्याची आशी शंका आली. त्या ठिकाणी अजुबाजुला मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचा घोळका पाहिल्यावर कळाले की, हल्ला बिबट्याने नव्हे तर कुत्र्यांनी केला आहे. त्याच भागात काही दिवसांपुर्वी किसन लक्ष्मण राठोड यांच्या बोकडाचा व काशीनाथ राठोड यांच्या शेळीचा फडशा पाडला होता. त्यामुळे या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

कुत्र्याचा बंदोबस्त होणे गरजेचे
अलिकडच्या काळात शेतकर्यांच्या पशुधनावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी बिबट्या तर कधी मोकाट कुत्रे गुरांचा फडशा पाडतात. यामुळे परिसरात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा प्राण्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी मागणी केली आहे.