पायऱ्या चढतांना चक्‍कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जळगाव: शिरसोलीरोडवरील रायसोनी अभियांत्रीकी महाविद्यालयात अंतिमवर्ष अभियांत्रीचे शिक्षण घेणाऱ्या स्कॉलर विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यु झाला. घरून दुचाकीवर पोचल्यानंतर शुभम सुनील गुरव हा प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढत असतांना खाली कोसळला. त्याच्या डोक्‍यावर मागील बाजुस गंभीर दुखापत होवून त्याची दातखिळी बसल्याने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत महाविद्यालयातील वर्गमित्र विद्यार्थ्यांनी डॉ. राजेश जैन यांच्या रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु झाल्यावर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

जळगाव शहरातील श्रीधर नगर येथील रहिवासी तथा मुलजी जेठा महाविद्यालयात योगशिक्षक दाम्पत्य सुनील व अर्चना गुरव यांचा एकूलता मुलगा शुभम (वय 23) हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे 11.20 वाजता शिरसोलीरोडवरील रायसोनी अभियांत्रीकी महाविद्यालयात पोचला. वाहन उभे करुन आत प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळच त्याला अचानक चक्कर आल्याने तो खाली कोसळला. शुभम डोक्‍यावर पडताच त्याची दातखिळी बसली. सुरक्षारक्षक आणि आवारात उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. डोक्‍याला मागील बाजूस लागल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेत त्याचे वर्गमित्र, शिक्षक व इतर विद्यार्थ्यांनी कुटूंबीयांना कळवून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच तासाभरात शुभमची प्राणज्योत मालवली. डॉ. राकेश तिवारी यांनी खबर दिल्यावरुन औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मित्रांची रुग्णालयात गर्दी...
रायसोनी अभियांत्रिकीत हुशार विद्यार्थ्यांपैकी एक शुभम गुरव खाली पडल्याने जखमी झाल्यावर त्याला घेवून पन्नास-ते साठ विद्यार्थी रुग्णालयात धडकले होते. दुपारी एक वाजता शुभमच्या मृत्युची माहिती डॉक्‍टरांनी देताच महाविद्यालयातील इतर विद्यार्थी, शिक्षकांनी धाव घेतली. त्याचे वडील सुनील गुरव आणि आई अर्चना दोन्ही एम.जे.कॉलेज मध्ये असल्याने तेथील शिक्षक वृंद, श्रीधरनगर परिसरातील रहिवाश्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली.