तरूण शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

दीपक कच्छवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव): टाकळी प्र.दे. (ता.चाळीसगाव) येथे तरुण शेतकऱ्याचा विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव): टाकळी प्र.दे. (ता.चाळीसगाव) येथे तरुण शेतकऱ्याचा विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

टाकळी प्र.दे. येथील शेतकरी जितेंद्र नाना सुर्यवंशी (वय 32) हा तरूण शेतकरी हॉटेल चंद्रमा समोरील त्याचे वडील नाना सुर्यवंशी यांच्या शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेलेला होता. पाणी काढत असताना जिंतेद्रचा अचानक पाय घसरला व तो विहीरीत पडला. पाण्यात पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजुबाजुचे शेतकरी जमा झाले. त्यांनी जितेंद्रला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालावली होती. याबाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :