अमळनेरमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेला ठोकले कुलूप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

रूपे कार्ड त्वरित मिळण्याची मागणी; 35 शेतकऱ्यांसह अडकले कर्मचारीही 

अमळनेर : शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर रास्तारोको केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील यांच्यासह दहा जणांना पोलिसांनी अटक करून लागलीच सोडले होते. मात्र, त्यानंतर पाटील यांनी बाजार समितीत धाव घेतली.

शेतकऱ्यांना रूपे कार्ड त्वरित वाटप करावेत यासाठी श्री. पाटील व काही शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेच्या येथील बाजार समितीतील शाखेस सायंकाळी आतून कुलूप ठोकले. यात सुमारे चाळीस शेतकरी व कर्मचारी अडकले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले आहेत. जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना रूपे कार्ड मिळत नाही, तोवर कुलूप उघडणार नाही असा पवित्रा श्री. पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतला आहे.