जळगाव: धरणगावातील तलाठी कार्यालयास आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

या आगीत खरेदी- विक्रीचे जुने दस्तावेज जळून खाक झाले आहेत. एक लॅपटॉपही जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही. आग लागलेल्या खोलीत जुनी दस्तावेज होती. या खोलीत विद्युत जोडणीही करण्यात आलेली नाही. मात्र, या आगीने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

अमळनेर : धरगणाव येथील बस स्थानकाजवळील तलाठी कार्यालयास अचानक आग लागून दस्तावेज जळून खाक झाले आहेत. ही घटना आज सकाळी निदर्शनास आली.

कार्यालयातील कर्मचारी नितीन चौधरी हे कार्यालयाकडे गेले असता त्यांना धूर दिसून आला. त्यांनी तातडीने शहर तलाठी एस. एच. मोरे, दीपक शिरसाठ यांनी कळविले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्‍यात आणण्यात आली.

या आगीत खरेदी- विक्रीचे जुने दस्तावेज जळून खाक झाले आहेत. एक लॅपटॉपही जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही. आग लागलेल्या खोलीत जुनी दस्तावेज होती. या खोलीत विद्युत जोडणीही करण्यात आलेली नाही. मात्र, या आगीने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या खोलीत महत्वाचे दस्तावेज नाहीत. जे होते त्यांच्या नोंदी झालेल्या होत्या, अशी माहिती शहर तलाठी एस. एच. मोर यांनी दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देवून पाहणी केली आहे. 

टॅग्स