जळगावः मुसळधार पावसामूळे घरे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पाचोरा (जि. जळगाव) : येथील बसस्थानका समोरील नागसेननगरातील दोन मातीची घरे बुधवारी (ता. 20) रात्री मूसळधार पावसामूळे जमीनदोस्त झाली. सूदैवाने जीवितहानी झाली नाही.

दोन्ही घरातील सर्व सामान दाबले गेल्याने दोघांचे संसार उघड्यावर आले आहेत. बुधवारी (ता. 20) सायंकाळी सूमारे दीड तास विजांच्या कडकडाटासह मूसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या पावसामूळे नागसेन नगरातील चिंधाबाई भिवसने या 65 वर्षीय वृध्देचे 2102 क्रमांकाचे व दगडू माने या 53 वर्षीय इसमाचे 2103 क्रमांकाचे मातीचे घर पडले भिवसने यांच्या घरात 18 सदस्य तर माने यांच्या घरात 4 सदस्य आहेत.

सूदैवाने घटना घडली, त्यावेळी घरात कोणी नव्हते. सर्व जण मोल मजूरी करतात. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य ढिगाऱयाखाली दाबले गेल्याने खराब झाले आहे. यामुळे ही दोन्ही कूटूंबे उघड्यावर आली आहेत. शासकिय मदतीची याचना होत आहे.