‘ग. स.’च्या अध्यक्षपदी विलास नेरकरांची निवड

‘ग. स.’च्या अध्यक्षपदी  विलास नेरकरांची निवड

जळगाव - जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नेरकर व उपाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शहरातील बळिराम पेठ भागात असलेल्या सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सहाय्यक सहकार उपनिबंधक डी. ए. शेळके होते. अध्यक्षपदासाठी विलास नेरकर व उपाध्यक्षपदासाठी कैलास चव्हाण या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  

सोसायटीत २१ संचालक असून, सहकार गटाचे स्पष्ट बहुमत आहे. सहकार गटात या दोन्ही पदांसाठी मोठ्या प्रमाणात अंतर्गत चुरस होती.

चेअरमनपदासाठी गटनेते उदय पाटील, उपाध्यक्षपदासाठी सुनील निंबा पाटील इच्छुक होते. गटाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक भीमराव भाऊराव तथा बी. बी. पाटील यांच्या निवासस्थानी आज सकाळी नऊला संचालकांची बैठक घेण्यात आली. त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी विलास नेरकर, तर उपाध्यक्षपदासाठी कैलास चव्हाण यांची नावे निश्‍चित करण्यात आली. नेरकर हे भडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असून, त्यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. सन २००८ मध्ये ते चेअरमन होते. उपाध्यक्ष कैलास चव्हाण हे कानळदा येथील शाळेत मुख्याध्यापक असून, त्यांना प्रथमच संधी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com