'गिरणा' 65 टक्के, तर 'मन्याड' 27 टक्के भरले

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मन्याड 27 टक्के....
चाळीसगाव तालुक्यासाठी महत्वपुर्ण असलेल्या मन्याड धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  धरणात आज पहाटे एकुण 860 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला.  यामुळे धरण 27 टक्के भरले. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. दरम्यान पाण्याची आवक मंदावली आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : गिरणा धरणाचा पाणीसाठा 65 टक्के झाला असून धरणात अत्यल्प आवक सुरु आहे. अशी माहिती शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. तर आज पहाटे मन्याड धरणात 27 टक्के साठा निर्माण झाला असल्याचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी सांगितले.

गिरणा धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. ठेंगोडा बंधाऱ्यातूून सध्या 567 क्यूसेक तर हरणबारी धरणातून 251 क्यूसेक विसर्ग गिरणात होत आहे. काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने आवक मंदावली आहे. धरणाचा एकुण साठा 15 हजार 5 दशलक्ष घनफुट असून 11 हजार 5 दशलक्ष घनफुट जिवंत साठा निर्माण झाला आहे. यामुळे धरण 65 टक्के भरले आहे. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ' दिली.