जळगाव: मांदुर्णेत चित्रीत झालेला 'हलाल' 29 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 30 जुलै 2017

'कान्स'सह 70 फेस्टीवलमध्ये झळकला....
फ्रान्सचा कान्स आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव, यशवंतराव चव्हाण चित्रपट महोत्सव, औरंगाबाद आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संस्कृती कलादर्पण आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अशा देश विदेशातल्या एकूण 70 फेस्टीवलमध्ये 'हलाल' झळकला आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या गावी मांदुर्णे (ता. चाळीसगाव)येथे चित्रीत झालेला 'हलाल' चित्रपट येत्या 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती 'हलाल'चे दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. या बातमीमुळे प्रेक्षकांची चित्रपट प्रदर्शित होण्याबद्दल असलेल्या उत्सुकतेला पुर्णविराम मिळाला आहे.

ऑक्टोंबर 2015 मध्ये मांदुर्णे (ता. चाळीसगाव) या शिवाजी लोटन पाटील यांच्या मुळ गावी चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ झाला होता. लेखक राजन खान यांच्या ‘हलाल’ या कांदबरीवर हा चित्रपट असून मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक पद्धतीवर चित्रपट आधारीत आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे या कलाकारांच्या देखील यात भूमिका आहेत. अमोल कागणे व लक्ष्मण कागणे यांची निर्मिती आहे. दरम्यान 29 सप्टेंबरला 'हलाल' प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे नवे पोस्टर देखील लॉंच करण्यात आले आहे. 