महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पोखरी येथून वाळू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

जळगाव - महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पाळधी येथून सुरवात झाली आहे. महामार्गाच्या कामासाठी लागणारी वाळू काढण्यासाठी पोखरी (ता. धरणगाव) येथील वाळू गटातून वाळू उपशास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म विभागाच्या सूत्रांनी दिली. याच ठिकाणी संबंधित कंत्राटदार प्रोसेसिंग युनिट व माईनिंग युनिट सुरू करणार आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महामार्गालगत असलेले जमिनींचे भू-संपादनाचे काम सुरू होते. हे काम 98 टक्के पूर्ण झाले असल्याने पुढील प्रशासनाकडून पुढील कामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गाच्या कामाला सुमारे अडीच हजार ब्रास वाळू लागणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने वाळू मिळण्यासाठी पोखरी वाळू गटाची मागणी केली होती. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने 10 लाख रुपयाचे टेंडर काढले आहे. 

बॅंक गॅरंटी जप्त 
प्रशासनाने नेमणूक केलेल्या पर्यावरण समितीच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच वाळू वाहतूक करीत असताना ताडपत्री न टाकता वाहतूक केल्याने जिल्ह्यातील बेलवाय, पिंपळगाव व मुंगसे येथील वाळू गटाच्या ठेकेदारांची सुमारे 6 ते 7 लाख रुपये इतकी बॅंक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे, असे जिल्हा खनिकर्म विभागाने सांगितले.