आंतरशालेय नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

जळगाव - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ अर्थात न्यूजपेपर इन एज्युकेशन या व्यासपीठांतर्गत विद्यार्थ्यांच्या अभिनय व संवाद कौशल्याला वाव मिळावा, यासाठी बुधवारी (२४ जानेवारी) आंतरशालेय नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी नाटकांची रंगीत तालीम सुरू केली असून, स्पर्धेची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित नाट्य स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, कलादर्श स्मृतीचिन्ह व किरसा नाईन डी मूव्हीज यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ही स्पर्धा मायादेवीनगरातील रोटरी हॉल येथे होईल.  

या नाट्य स्पर्धेत शहरातील तेरा शाळांनी सहभाग नोंदविला आहे. नाट्य स्पर्धेत सहभागी शाळांच्या संघाची नाटकाची रंगीत तालिक जोमाने सुरू असून, स्पर्धेत आपले नाटक सादर करण्यासाठी कलावंत सज्ज झाले आहेत. 

नाटकातील पात्रांचे संवाद पाठ करणे, संवादफेकीचे कौशल्य आत्मसात करणे, अभिनय उत्कृष्ट कसा होईल, याची शास्त्रशुद्ध पद्धतीने तालीम केली जात आहे. शिवाय, ‘सकाळ- एनआयई’तर्फे देखील तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धा संयोजनाचे अधिकार ‘सकाळ-एनआयई’कडे आहेत. 

स्पर्धेत अभिनय, नाटिकेचा विषय व आशय यांच्या आधारे गुणांकन केले जाईल. अधिक माहितीसाठी ‘एनआयई’ समन्वयिका हर्षदा नाईक (भ्रमणध्वनी : ८६२३९१४९२६) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: jalgaon news interschool natya competition preparation