जळगाव रेल्वेस्थानकातील लिफ्ट प्रवाशांसाठी खुली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

जळगाव - येथील रेल्वेस्थानकातील फलाटावर जाण्यासाठी दोन दादऱ्यांचा पर्याय होता; परंतु दिव्यांग किंवा मोठ्या बॅग घेऊन जाणाऱ्यांना दादऱ्यावरून जाण्यास अडचणी होत असल्याने, रेल्वे प्रशासनाने लिफ्टची सुविधा उपलब्ध केली. या लिफ्टचे उद्‌घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते धुळे येथून करण्यात आले. यानंतर लिफ्ट प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मंत्री प्रभू रेल्वेच्या विविध कामांच्या प्रारंभानिमित्त धुळे येथे आले होते. यादरम्यान मंत्री प्रभू यांनी दुपारी धुळे येथून ऑनलाइन पद्धतीने जळगाव ते मनमाड या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन केले.

जळगाव - येथील रेल्वेस्थानकातील फलाटावर जाण्यासाठी दोन दादऱ्यांचा पर्याय होता; परंतु दिव्यांग किंवा मोठ्या बॅग घेऊन जाणाऱ्यांना दादऱ्यावरून जाण्यास अडचणी होत असल्याने, रेल्वे प्रशासनाने लिफ्टची सुविधा उपलब्ध केली. या लिफ्टचे उद्‌घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते धुळे येथून करण्यात आले. यानंतर लिफ्ट प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मंत्री प्रभू रेल्वेच्या विविध कामांच्या प्रारंभानिमित्त धुळे येथे आले होते. यादरम्यान मंत्री प्रभू यांनी दुपारी धुळे येथून ऑनलाइन पद्धतीने जळगाव ते मनमाड या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन केले. याचवेळी येथील रेल्वेस्थानकात तयार झालेल्या लिफ्टचेदेखील उद्‌घाटन केले. उद्‌घाटनानंतर लिफ्ट प्रवाशांसाठी खुली करण्यात आली.