विद्यार्थी बनविणार आकाशकंदील!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

जळगाव - दिवाळीच्या काळात आपल्या हाताने तयार केलेला आकाशकंदील घरावर लावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. यंदा हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता येणार आहे. दिवाळीनिमित्त ‘सकाळ- एनआयई’तर्फे ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा रविवारी (८ ऑक्‍टोबर) होत असून, स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. 

‘सकाळ- एनआयई’ व ‘समाधा क्रिएशन’तर्फे ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा दोन गटांत होणार असून, यात पहिला गट चौथी ते सहावी व दुसरा गट सातवी ते दहावी असेल. ‘एनआयई’चे सभासद असणाऱ्या मुला-मुलींसह अन्य विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. यात विद्यार्थांना एका तासात आकर्षक व सुंदर आकाशकंदील बनवायचा आहे. उद्या शिवतीर्थ मैदानावरील ‘सकाळ शॉपिंग उत्सव’ व ‘ऑटो एक्‍स्पो’ प्रदर्शनस्थळी सकाळी नऊला स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कार्डशीट, रंगीत कागद, कात्री, डिंक, स्केचपेन; यासोबतच सजावटीसाठी आवश्‍यक साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत आणावे. अधिक माहितीसाठी समन्वयिका हर्षदा नाईक (८६२३९१४९२६) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येकास हमखास बक्षीस!
‘सकाळ- एनआयई’ व ‘समाधा क्रिएशन’तर्फे आयोजित ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा दोन गटांत होत आहे. यात पहिला गट चौथी ते सहावीचा असून, यात आकर्षक आकाशकंदील बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे एक हजार रुपये, सातशे रुपये व पाचशे रुपयांचे ‘गिफ्ट व्हाउचर’ ठेवण्यात आले आहे, तर दुसऱ्या गटात सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनादेखील तीन ‘गिफ्ट व्हाउचर’ देण्यात येणार आहे. यासोबतच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनादेखील ‘व्हाउचर’ कुपन देण्यात येणार आहे.