चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुख्यमंत्र्यांनी 70 टक्के मागण्या मंजूर केल्यात हे आश्वासन संपाच्या पहिल्या दिवशीच दिले होते, जो काही निर्णय घ्यायचा होता तो पुणतांबा येथे घ्यावा असे ठरले होते. याकडे दुर्लक्ष केले मुख्यमंत्री सांगतात सकाळी बैठक घ्यावी आणि ऐनवेळी रात्री बैठक घेण्या मागचा उद्देश काय?

जळगाव : शेतकरी संपाबाबत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कृती समितीसह भाजपा वगळता सर्व पक्षीय नेत्यांनी आज सकाळी दहाच्या सुमारास चोपडा धरणगाव रस्त्यावर धरणगाव चौफुली जवळ अर्धा ते पाऊण तास ठिय्या मांडून चक्का जाम आंदोलन केले

मुख्यमंत्र्यांनी 70 टक्के मागण्या मंजूर केल्यात हे आश्वासन संपाच्या पहिल्या दिवशीच दिले होते, जो काही निर्णय घ्यायचा होता तो पुणतांबा येथे घ्यावा असे ठरले होते. याकडे दुर्लक्ष केले मुख्यमंत्री सांगतात सकाळी बैठक घ्यावी आणि ऐनवेळी रात्री बैठक घेण्या मागचा उद्देश काय? पुणतांबा गावाचे नाव बदनाम केले मुख्यमंत्री पहिल्या बैठकीत सकारत्मकता दाखवितात मग असे तोंडाला पाने का पुसली? वीजबिल दंड आणि व्याज हे तर संजीवनी योजनेत माफ केले जाते नवीन काय? आयात निर्यात धोरण बाबत निर्णय नाही शेतकरी व व्यापारी या मध्ये भांडणे लावण्याचा प्रकार मुख्यमंत्री महोदय करीत आहेत हे पाप कधीही फेडू शकत नाही. बैठकीत ज्यांचा अभ्यास नव्हता त्यांना दूर ठेवले गुजरातीप्रमाणे वीजबिल निर्णय नाहीं, खतांना सबसिडी नाही. घेतलेला निर्णय चुकीचा आहे, यामध्ये शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी कृती समितीचे राज्य समन्वयक एस. बी. पाटील यांनी आज केलेल्या चक्का जाम आंदोलन प्रसंगी केले.

वारंवार मागण्या मान्य करण्यासाठी इच्छा मरणाची मागणी केली. संप केला पण याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले नेतृत्वाचा अभ्यास नसल्याने सोयीस्कर प्रश्नांना बगल दिली. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. महाराष्ट्राचा शेतकरी का आत्महत्या करतो याचे विवेचन बऱ्याचदा झाले फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्ज माफ करणे हे तर तामिळनाडू उच्च न्यायालय व इतर न्यायालयांनी देखील ठरविले आहे ते कायदेशीर आहे. सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, वीज बिल माफ झालेच पाहिजे, पीक विमा योजना फसवी आहे. पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक निर्णय बाकी आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​
शेतकऱ्यांना संपवण्याचे सरकारचे धोरण - शरद पवार

'ईव्हीएम' हॅकेथॉन आज होणार
मेनका गांधी रुग्णालयात दाखल​