...आणि मृत शरीराशेजारी माकड येऊन बसले!

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पिलखोड (ता. चाळीसगाव): वेळ सकाळी अकराची... अत्यंविधीसाठी गर्दी जमलेली... चक्क एक माकड पार्थिवाशेजारी येऊन बसते... मृत व्यक्ती विषयी त्या माकडाची संवेदना पाहून अनेकांचे अश्रु अनावर होतात... ही घटना घडली आहे सायगाव (ता. चाळीसगाव) येथे. माकडाच्या या अजब घटनेविषयी परिसरात चर्चा सुरु आहे.

माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही भावना व संवेदना असतात हे आज सायगाव (ता. चाळीसगाव) येथील एका घटनेत दिसून आले. सकाळी अकरा वाजेची ही घटना आहे. सायगाव येथे सुकदेव धर्मा रोकडे यांच्या अंत्यविधीसाठी गर्दी जमली होती. त्यादरम्यान माकड एका घराच्या गच्चीवर बसून घडणारा सगळा प्रकार न्याहळत होता. पार्थिवाची अंघोळ घातल्यानंतर आरती सुरु झाली. त्यावेळी माकड खाली आला आणि पार्थिवाशेजारी बसला. त्याने त्यादरम्यान आरतीच्या ताटाला हात लावला. शिवाय (कै.) रोकडे यांच्या डोक्यावरुन हात फिरवला. सुमारे दहा मिनिटे माकड तेथे बसला होता. अनेकांनी या माकडाचा व्हिडीओ घेतला. माकडाचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने त्याची परिसरात चर्चा सुरु आहे.

हेच ते शेपुट तुटलेले माकड...
गेल्या कित्येक महिन्यांपासून हे अर्धवट शेपुट तुटलेले माकड परिसरात फिरते आहे. पिलखोडसह जवळच्या सायगाव व इतर गावांमध्ये तो फिरत असतो. या माकडाला लहान मुले त्रास देतात यामुळे तो चवताळतो. परिणामी ग्रामस्थांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जातो. अनेकांना त्याने मारले देखील आहे. पिलखोड येथे महिनाभरापासून याच माकडाचा उपद्रव वाढला आहे. कालपासून तो सायगावात गेला आहे. दरम्यान, आज त्याचे असे भावनिक दृश्य पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले होते.