जळगाव: खूनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करत मृतदेह आणला पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

चाळीसगाव (जि. जळगाव) - ओझर येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका निवृत्त मिल कामकाराच्या कुटुंबियांनी हा घातपाताचा प्रकार असून यासंदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मृतदेह पोलिस ठाण्यात आणला आहे. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ओझर येथील निवृत्त मिल कामगार कैलास सुपडू पाटील यांचा मृतदेह टेकवाडे शिवारात गोसावी यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत सहा जुलै रोजी आढळून आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला आत्महत्या व अत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मयत कैलास सुपडू पाटील यांच्या सैन्यात असलेल्या दोघे मुलांनी मृतदेह पाहिला असता त्यांना तो घातपाताचा प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी शनिवारी थेट मृतदेह घेऊन चाळीसगाव पोलिस स्टेशन गाठले व आमच्या वडिलांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली. खुनाचा गुन्हा नोंदवावा. अन्यथा पो.स्टे. मधून मृतदेह घेऊन जाणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे पो. स्टे.ला तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी 11 वाजता पोलिस स्टेशनला नातवाईकांचा मोठा समुह जमला. प्रथम मृतदेह अप्पर पोलिस कार्यालयात नेण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव हे शिर्डी येथे बंदोबस्तात गेले असल्याने नातेवाईकांनी शेवटी शहर पोलिस स्टेशन गाठले. यावेळी डिवायएसपी अरविंद पाटील, पो. नि. रामेश्वर गाडे पाटील यांनी जमावाचे म्हणणे ऐंकून घेतले.