चाळीसगाव: ग्रामविकास अधिकाऱ्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

दीपक कच्छवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

वाघळी (ता.चाळीसगाव) येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संजय तुकाराम मोरे ( 42 ) हे खाजगी कामानिमीत्त धुळे येथे गेले होते. त्यांचे काम आटोपून आपल्या स्वत:च्या दुचाकीवरून चाळीसगावकडे येत असतांना रात्री आठच्या सुमारास चिंचगव्हाण फाट्यावर चाळीसगाव कडुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

मेहुणबारे ता.चाळीसगाव : धुळेकडुन चाळीसगावकडे जाणाऱ्या  दुचाकीस्वरास अज्ञात वाहनाने चिंचगव्हाण फाट्याजवळ जोरदार धडक दिली. त्यात वाघळी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामविकास अधिकारी यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची घटना काल(ता. 19) रात्री आठच्या सुमारास चाळीसगाव-धुळे महामार्गावर घडली.

वाघळी (ता.चाळीसगाव) येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संजय तुकाराम मोरे ( 42 ) हे खाजगी कामानिमीत्त धुळे येथे गेले होते. त्यांचे काम आटोपून आपल्या स्वत:च्या दुचाकीवरून चाळीसगावकडे येत असतांना रात्री आठच्या सुमारास चिंचगव्हाण फाट्यावर चाळीसगाव कडुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाच्या जबर धडकेत संजय मोरे हे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील संजीवनी रूग्णालयात नेण्याचे ठरले. त्यानुसार त्यांना घेऊन जाताना संजय मोरे यांचे रस्त्यातच मृत्यू झाला.

संजय मोरे यांचे मुळगाव हातगाव ता.चाळीसगाव हे असुन त्यांच्यावर आज दुपारी अडीच वाजता अंत्यविधी करण्यात आला. हा आपघात काल (ता. 19) रात्री आठ वाजता झाला आहे. दरम्यान या अपघाची मेहुणबारे पोलिस ठाण्यात कुठलीच नोंद करण्यात आलेली नव्हती.

Web Title: Jalgaon news one killed in accident