वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पावरील कामगाराचा पाण्यात बुडुन मृत्यू 

दीपक कच्छवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मृत्यु नेमका कशामुळे? 
​वरखेडे -लोंढे बॅरेज प्रकल्पावरील कामगार बिलु मुंडा हा पगार घेतल्या दिवसापासुन गायब होता.त्याचा कामावर  कुणाशी वाद तर झाला नाही ना ?  असे अनेक प्रश्न आता  उपस्थित होत आहे. हा अकस्मात मृत्यू नसुन  घातपात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेमका मृत्यु कशामुळे झाला हे मात्र कोडेच आहे ?

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : येथुन जवळच असलेल्या वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पावर खडी तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पावरील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह भितीजवळच्या खड्यातील पाण्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मेहुणबारे पासुन दहा किलोमीटर अंतरावर वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या उजव्या बाजुच्या संरक्षण भिंतींच्या कामासाठी मशनरी द्वारे खडी तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश मधील बहुतांश मजुर आहेत. बिलु मुंडा ( वय 40 ) हा कामगाराने दि.8 रोजी शुक्रवारी पगार घेतला त्या दिवसापासून तो कामावर आलाच नाही. त्याच्या साथीदारांनी त्याचा दोन दिवसापासून आजुबाजुच्या गावात तपास करीत होते. मात्र बिलु हा कुठेच आढळून आला नाही. आज सकाळी वरखेडे  गावातील ग्रामस्थ फिरण्यासाठी गेले असता त्याना प्रकल्पाच्या भिंतीजवळील पाण्याच्या डबक्यात बिलु मुंडा यांचा मृतदेह तरंगत असताना दिसला व एकच खळबळ उडाली गावातील पोलिस पाटील राधेश्याम जगताप यांनी या घटनेची माहीती मेहुणबारे पोलिसांना दिली असुन मृतदेह काढण्याचे काम अजुनही सुरू आहे.

मृत्यु नेमका कशामुळे? 
वरखेडे -लोंढे बॅरेज प्रकल्पावरील कामगार बिलु मुंडा हा पगार घेतल्या दिवसापासुन गायब होता.त्याचा कामावर  कुणाशी वाद तर झाला नाही ना ?  असे अनेक प्रश्न आता  उपस्थित होत आहे. हा अकस्मात मृत्यू नसुन  घातपात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नेमका मृत्यु कशामुळे झाला हे मात्र कोडेच आहे ?