पोलिस दलातर्फे ‘वन-वे’, ‘पार्किंग झोन’ची निश्‍चिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

जळगाव - शहरातील नेहरु चौक, रेल्वेस्थानक चौक, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. या परिसरात पार्किंगची जागा नसल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. तसेच शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य वाहनाधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जळगाव - शहरातील नेहरु चौक, रेल्वेस्थानक चौक, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. या परिसरात पार्किंगची जागा नसल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. तसेच शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य वाहनाधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वाहतुकीची समस्या लक्षात घेता मागील आठवड्यात पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शहरातील प्रमुख ठिकाणची पाहणी करून वाहतुकीची समस्या जाणून घेतली होती. त्यानुषंगाने ‘नो पार्किंग झोन’ व ‘वन वे’साठी शहर वाहतूक पोलिसांकडून शहरात अधिसूचना जारी करण्यात आली. 

पोलिसदलातर्फे जारी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्याच्या पट्टयांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता पार्किंग झोन, जिल्हा परिषद चौक ते टॉवर चौक रस्त्यांच्या दोन्ही बाजूस पार्किंग पट्ट्यांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, टॉवर चौक ते घाणेकर चौक रस्त्याच्या पट्ट्यांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, टॉवर चौक ते घाणेकर चौक दरम्यान जाण्याचा व येण्याचा मार्ग हा तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ‘नो पार्किंग झोन’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

घाणेकर चौक ते सुभाष चौक रस्त्याच्या पट्ट्यांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, खैरनार ऑप्टिकल ते सुभाष चौक रस्ता एकेरी मार्ग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला असून, सुभाष चौक ते खैरनार ऑप्टिकल दरम्यान सर्व प्रकारच्या अजवड वाहनांना प्रवेश बंदी, प्रभात चौक ते मू. जे. महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पट्ट्यांमध्ये विषम तारखेस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, प्रभात चौक ते मू. जे. महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार या रस्त्याच्या उजव्या बाजूच्या पट्ट्यांमध्ये सम तारखेस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या वाहनांसाठी नेहरू चौक ते  रेल्वेस्थानक रस्त्याऐवजी नेहरू चौक ते खान्देश सेंटल मॉल मार्गे रेल्वेस्थानक या मार्गाचा वापर करावा. सेशन कोर्ट ते ख्वाजामियॉ चौक रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पट्ट्यांमध्ये विषम तारखेस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, ख्वाजॉमियॉ ते सेशन कोर्ट चौक रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्यांमध्ये सम तारखेस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन, गोलाणी मार्केट हनुमान मंदिर ते भगवती स्वीट मार्ट दरम्यानचा मार्ग एकेरी मार्ग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. भगवती स्वीट मार्ट ते गोलाणी मार्केट हनुमान मंदिर दरम्यान जाण्याचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना शहर वाहतूक शाखेवतीने जारी करण्यात आली आहे.

Web Title: jalgaon news one-way parking zone declare by police