"उमवि'त प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदा संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. प्रवेशासाठी प्रथमच केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया राबविली. विशेष म्हणजे त्यासाठी विद्यापीठाच्या संगणक केंद्राने स्वतः तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ही प्रक्रिया राबविली. महाविद्यालये व प्रशाळा अशा दोन्हींसाठी ऑनलाइन प्रक्रिया स्वबळावर राबविणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एकमेव ठरले आहे. 

राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (एमकेसीएल) व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्या आधारावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतः तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून यावर्षी प्रथमच एम. एस्सी. ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या संकल्पनेतून ती प्रत्यक्षात अमलात आली आहे.