जळगाव: ग्रामीण डाक सेवकांची टपाल कार्यालयावर धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मागण्यांसाठी सात दिवसांपासून बेमुदत संप सुरूच

जळगाव: ग्रामीण भागात करणारे पोस्ट विभागातील खातेबाह्य कर्मचारी अर्थात डाक सेवकांच्या विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू असून, शासनदरबारी दखल घेतली जात नसल्याने आज (ता.22) डाक सेवकांनी मोर्चा काढत मुख्य टपाल कार्यालयावर धडक दिली.

मागण्यांसाठी सात दिवसांपासून बेमुदत संप सुरूच

जळगाव: ग्रामीण भागात करणारे पोस्ट विभागातील खातेबाह्य कर्मचारी अर्थात डाक सेवकांच्या विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू असून, शासनदरबारी दखल घेतली जात नसल्याने आज (ता.22) डाक सेवकांनी मोर्चा काढत मुख्य टपाल कार्यालयावर धडक दिली.

ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेच्यावतीने 16 ऑगस्टपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. ग्रामीण भागात काम करत असताना खात्याच्यावतीने वागणूकीत दुजाभाव केला जातो. देशभरात सुमारे 3 लाख 50 हजार डाक सेवक असून देखील खात्यामध्ये आजपर्यंत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची परिस्थिती अतिशय हालाकिची आहे. शिवाय पोस्ट खात्यामार्फत कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसून, या जाचाला कंटाळून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील चारशे कर्मचारी सहभागी आहेत. यामध्ये प्रामुख्याने कमलेशचंद्र कमेटीच्या शिफारसी संघटनेने सुचविलेल्या बदलानुसार ताबडतोब लागू कराव्यात, ग्रामीण डाक सेवकांना आठ तासाचे काम देवून खात्यात समाविष्ट करणे, कॅट (दिल्ली) आणि मद्रास न्यायालयाच्या आदेशानुसार पेंशन सुविधा लागू करणे, तसेच उद्दीष्टाच्या नावाखाली चाललेला छळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

पण, शासनाकडून अद्याप याची दखल घेतली जात नसल्याने आज मोर्चा काढण्यात आला. सकाळी साडेदहाला रेल्वेस्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चाला सुरवात झाली. जळगाव शाखेचे सेक्रेटरी ज्ञानेश्‍वर पाटील, अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह कार्यकारणी पदाधिकारी व कर्मचारी मोर्चात सहभागी होते. सदर मोर्चा पांडे डेअरी चौकाजवळील मुख्य पोस्ट कार्यालयावर नेवून येथे निवेदन देण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात