पाचोरा येथे रेल्वे अधिकारी रेल्वेखाली सापडून ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जळगाव : पाचोरा येथील रेल्वे स्थानकावर सिनीअर सेक्शन इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले बी. आर. मोहरीर (वय 55) यांचा गाळण शिवारात कर्तव्यावर असतांना धावत्या रेल्वे खाली सापडून मृत्यु झाल्याची घटना आज (सोमवार) पहाटे घडली.

गाळण शिवारात रेल्वे मार्गावर बिघाड झाल्याने त्या दुरूस्ती साठी मोहरीर हे आपल्या चार सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले होते. तेथे बिघाड शोधत असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागून मोहरीर लांब फेकले गेले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच अंत झाला. घटना कळताच रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली. मोहरीर यांच्या अपघाती मृत्युमुळे हळ्हळ व्यक्त होत आहे.